माजी सनदी अधिकारी महिलेने त्यांच्या स्वकमाईच्या बचतीचा बहुतांश भाग मेंदू संशोधनासाठी दान केला!
शर्वरी गोखले या महाराष्ट्राच्या माजी सनदी अधिकारी होत्या ज्यांचे गेल्या वर्षीच पोटाच्या कर्करोगाशी तीन वर्ष झुंजल्यानंतर निधन झाले. शर्वरी या मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी होत्या. त्याना शास्त्रीय संशोधन आणि विकास या क्षेत्रात विशेष आवड होती. त्यामुळेच त्यांच्या आजारपणातूनही त्यांनी जीवनातील जमापूंजीचा मोठा हिस्सा वैद्यकीय आणि शास्त्रीय संशोधनासाठी दान केला होता.

Image Source: Times of India
शर्वरी या १९७४च्या गटातील सनदी अधिकारी होत्या, आणि ३६ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या. त्या अतिरिक्त प्रधान सचिव (आरोग्य) या पदावरून सेवा निवृत्त झाल्या. त्यांना पोटाच्या कर्करोगाचे निदान त्याच्या निवृत्तीनंतर झाले होते, त्यासाठी त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही आणि हे स्पष्ट झाले की त्या या लढाईत हारणार आहेत. त्याही अवस्थेत त्यांनी विचार केला आणि अंधेरी येथील त्यांचे राहते घर मेंदू संशोधनासाठी मेंदू संशोधन केंद्राला देण्याचा निर्णय घेतला, जे आय आयएस बेंगळूरू यांनी स्थापन केले आहे.
त्यांच्या सहकारी आणि मैत्रिण असलेल्या, महाराष्टाच्या माजी सनदी अधिकारी असलेल्या चंद्रा अय्यंगार म्हणाल्या की, “ त्यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरू होते, त्यात केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण ज्यावेळी शर्वरी यांच्या लक्षात आले की ही लढाई त्या जिंकू शकत नाहीत, त्यांनी सहा ते आठ महिने पूर्ण विचार करून माहिती घेतली की त्या त्यांच्यामागे त्यांच्या बचतीच्या पैशांचा विनीयोग कसा करणार आहेत. त्या म्हणत की, “माझा पैसा माझ्याच देशात राहील आणि त्यातून शास्त्रीय संशोधन होईल”,” त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना हा पैसा सेवाभावी संस्था किंवा सामाजिक उपक्रमात देण्याचा सल्ला दिला त्यावेळीही त्यांनी हा पैसा सीबीआर ला देण्याचा आपला निश्चय बदलला नाही. शर्वरी या निग्रहीवृत्तीच्या महिला होत्या आणि त्याच्या हयातीमध्येच त्यानी आपला पैसा सीबीआर या संस्थेमध्येच योग्य कामासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. मिरा बोरवणकर , पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त यांनी त्यांना या कामी मदत केली होती. त्या म्हणाल्या की, “ सीबीआर ला आपली मालमत्ता देण्याबाबत त्या निश्चयी होत्या, त्यांचा पैसा त्यांनी संस्थेला देण्याचे ठरविले होते, जी त्यांच्यामते त्याचा चांगला उपयोग करेल, आणि त्यांच्या मनासारखे मोठ्या प्रमाणात संशोधन करेल”.
शर्वरी यानी खात्री करून घेतली होती की त्यांच्या इच्छेनुसार मुंबईतील घराची त्यांच्यामागे व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही. हे माहिती करून घेतल्यानंतर सहा दिवसांनी शांतपणे त्यांनी प्राण सोडले, १५ जानेवारी २०१६ रोजी. याबाबतच्या कागदपत्राची छाननी झाल्यावर ही मालमत्ता सिबीआरला हस्तांतरीत होणार आहे. याबाबत सीबीआरनेही त्यांच्या संकेत स्थळावर म्हटले आहे की, “ त्यांच्या मृत्यूपत्रातून कु. गोखले यांनी त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग सीबीआर करिता दान केला आहे. मानवी शरिरातील महत्वाचा अवयव असलेल्या मेंदूच्या संशोधनासाठी त्यांनी हे दान केले आहे”.
शर्वरी यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता असे त्यांच्या सहकारी मित्र सांगतात, त्यांच्याजवळ त्यांच्या मृत्य़ूनंतरही मानवी हित आणि शास्त्रिय संशोधन होत राहावे यासाठी कळकळ आणि दृष्टी होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्य़ूनंतरही त्या अमर झाल्या आहेत.