‘गेटमायपिअन’- वडापाव घरपोच करण्यापासून ते विमानतळावरून पाहुण्यांना आणण्यापर्यंतची सेवा देणारा अभिनव उपक्रम
‘गेटमायपीअन’ (GetMyPeon) ही कंपनी म्हणजे मुंबईतील एक अभिनव प्रयोग असलेली अशी ‘सेम-डे डिलिव्हरी’ सेवा देणारी कंपनी आहे. लोकांचे रोजचे जगणे सोपे बनवून ते क्रांतीकारी बदल घडवावेत या उद्देशाने GetMyPeon ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. समर्पित व्यावसायिकांच्या टीमसोबत ही कंपनी लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबधित विश्वसनीय आणि स्वस्त सेवा उपलब्ध करते.

१ जुलै २०१५ या दिवशी ‘गेटमायपीअन’ (GetMyPeon) ने आपल्या कामाची तीन वर्षे पूर्ण केली. ‘गेट थिंग्ज डन’ ही कंपनीची टॅगलाईन आहे. ‘गेटमायपीअन’ (GetMyPeon) ही कंपनी विशिष्ट वडापाव स्टॉल वरून वडापावाची डिलिव्हरी करण्यापासून ते ग्राहकाच्या एखाद्या मित्राला विमानतळावरून घेऊन येणे, ग्राहकांच्या आजी-आजोबांना तपासण्यासाठी एखाद्या क्लिनिकमध्ये घेऊन जाणे अशा सेवा पुरवते. ‘गेटमायपीअन’ (GetMyPeon) ने एकाच दिवसात सेवा पुरवण्याची नवी पद्धत देखील शोधून काढली आहे.
‘गेटमायपीअन’ला २.५ लाख डॉलर्सचे सीड-फंडिंग
‘गेटमायपीअन’ने आपल्या जन्मानंतर २०१२ मध्ये अलिकडेच २.५ लाख डॉलर्सची पहिली सीड फंडिंग प्राप्त केली आहे. ‘गेटमायपीअन’चे संस्थापक भरत अहिरवार या फंडिंगबाबत बोलताना सांगतात, “ लोकांचे दररोजचे जगणे सोपे बनवण्याच्या उद्देशाने ‘गेटमायपीअन’ सुरू करण्यात आले होते. आता ही कंपनी एक विश्वसनीय, ग्राहकांना परवडण्याजोगी, ग्राहकांनी विसंबून राहवे अशी आणि आपल्यासाठी केव्हाही उपलब्ध असणारी सेवा बनली आहे. मुंबईत कोणीही आपल्या व्यक्तिगत अथवा कार्यालयीन कामाशी संबंधीत या कंपनीची सेवा घेऊ शकतो. मग ते केक, पार्सल्स, भेट वस्तू, लग्नाच्या आमंत्रण पत्रिका पिक अप करण्याचे काम असो किंवा मग कुरिअर किंवा आपली कार वा बाईकची सर्विसींग करण्याचे काम असो, अशा सर्व प्रकारच्या सेवांची ऑफर ही कंपनी देते. या फंडिंगच्या माध्यमातून आम्हाला आमच्या कंपनीच्या कार्याला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी मोठी मदत मिळेल."
‘गेटमायपीअन’ला प्राप्त झालेला फंड निश्चितच तंत्रज्ञान( फ्रंट एंड आणि बॅक एंड) वाहने, फिल्ड कर्मचा-यांची भर्ती करणे, मोबाईल प्लॅटफॉर्म आणि भौगोलिक विस्तारासारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामी वापरला जाणार आहे.

‘गेटमायपीअन’चा विकास
‘गेटमायपीअन’ची विकासाची कथा खूपच मनोरंजक आहे. २०१२ मध्ये ही कंपनी सुरू झाल्याबरोबर कंपनीने ३५ हजाराहून अधिक कामांचा निपटारा केला आहे. याबरोबर मुंबई, ठाणे, वाशीमध्ये १५ हजारांहून अधिक ग्राहकांना आपली सेवा दिली आहे. सध्या कंपनीकडे ६० पेक्षा अधिक फिल्ड एक्झिक्युटीव्ह्सची टीम कार्यरत आहे. कंपनी आता दररोज १५० ते २०० कामे हातावेगळी करत आहे. या कामांसाठी आकारण्यात येणारी किंमत २०० रूपयांपासून ते १५०० रूपयांदरम्यान आहे. २०१२ मध्ये ही सेवा फेसबुक आणि ट्वीटरपेजच्या माध्यमातून लाँच केली गेली, तर पुढे २०१३ च्या मध्यावर कंपनीची वेबसाईट लाँच करण्यात आली. सध्या कंपनीच्या फेसबुक पेजवर ४५०० हून अधिक फॉलोअर्स आहेत. केवळ २० हजार रूपयांच्या भांडवलाने सुरू झालेल्या ‘गेटमायपीअन’ने आता यशाची एक भव्य उंची गाठलेली आहे.
‘गेटमायपीअन’ ही कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार ‘कस्टमाईज्ड’ सेवा देते. कंपनीने ऑफर केलेल्या काही सेवांमध्ये पिक-अप आणि ड्रॉप ( अन्न, पार्सल्स, चेक्स, लॉन्ड्री, केक्स, लग्नपत्रिका, कागदपत्रे, पत्रे, पाहुणे, कार आणि बाईक्स), दुरूस्ती, पाहुण्यांना विमानतळांवरून घेऊन येणे, वीज आणि फोनबील इत्यादी जमा करण्यासाठी व्यक्तीची सेवा घेण्याच्या सुविधांचा समावेश होतो.
कॉल्स आणि ई-मेल्सच्या माध्यमातून ऑर्डर्स घेण्याच्या पारंपारिक पद्धतीं व्यतिरिक्त ही कंपनी व्हॉट्सअप, मोबाईल मेसेंजर आणि ट्विटरवरील ट्विट्सच्या माध्यमातून सुद्धा ऑर्डर स्वीकारते.
स्पर्धा आणि भविष्यकालीन योजना
सध्याच्या घडीला भारतामध्ये या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची थेट स्पर्धा नाही. परंतु टाईम्सअॅवर्स (Timesavers) आणि ग्रॉफर्स (Grofers) सारख्या कंपन्या ‘गेटमायपीअन’ देत असलेल्या सेवांपैकी काही सेवा देत बाजारात आपले स्थान तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या क्षेत्रात असलेल्या स्पर्धेबाबत बोलताना भरत अहिरवार सांगतात, “ आम्ही बाजारपेठ नसल्याकारणाने ‘गेटमायपीअन’ अजून टीकून आहे. फील्डवर काम करणारी आमची स्वत:ची प्रशिक्षित अशी कुशल टीम काम करत आहे. ही टीम प्रत्येक काम ९० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची हमी देते. आम्ही ग्राहकाच्या विनंतीनुसार ‘कस्टमाईज्ड’ सेवा देण्याचे काम करतो. शिवाय शहरातील ग्राहकांच्या व्यक्तीगत, तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गरजा आम्ही पूर्ण करू शकतो.”
भविष्यकालीन योजनेचा विचार करता ‘गेटमायपीअन’ लवकरच एक अॅप लाँच करून बंगळुरू, पुणे आणि दिल्लासारख्या देशातील अन्य शहरांमध्येही आपला विस्तार करणार आहे. या व्यतिरिक्त हे वर्ष संपेपर्यंत ‘गेटमायपीअन’ या कंपनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
